लोकशाहीच्या बदनामीसाठी संसदेच्या सुरक्षेशी खेळ   

दिल्ली पोलिसांचे आरोपपत्र

नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीची बदनामी करण्याच्या हेतुने गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी संसदेची सुरक्षा आरोपींनी भेदली होती. तेथे पिवळ्या धुराचे डबे फोडले होते. त्या माध्यमातून ते जगाचे लक्ष भारताकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. एकप्रकारे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्यासाठी आरोपींनी तसे केले होते, अशा आशयाचे आरोपपत्र दिल्ली पोलिसांनी दिल्ली न्यायालयात दाखल केले आहे.
 
समाज माध्यमांचा गैरवापर करून २००१ मध्ये आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर संसदेत पिवळा धूर पसरविण्याचे कारस्थान रचले होते. त्याबाबतची एक बैठक फेब्रुवारी २०२२ मध्ये आरोपींनी म्हैसूरमध्ये घेतली होती. अशा प्रकारच्या पाच बैठका आरोपींनी दिल्ली, गुरूग्राम आणि म्हैसूरमध्ये घेतल्या होत्या.सुमारे १ हजार पानांहून अधिक असलेले आरोपपत्र तयार केले आहे. प्रथम ते पतियाळा हाऊस न्यायालयात जूनमध्ये दाखल केले. त्याची दखल गेल्या महिन्यात घेण्यात आली होती. त्यानंतर जुलैमध्ये पुरवणी आरोपपत्रही दाखल झाले होते. 

Related Articles